दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा डॉ. किशोर पाटीलआगरी समाजातील अनमोल रत्न म्हणजे अभिजीत पाटील - डॉ. मनीलाल शिंपी
दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा डॉ. किशोर पाटील
आगरी समाजातील अनमोल रत्न म्हणजे अभिजीत पाटील - डॉ. मनीलाल शिंपी
आगरी समाजातील मुले आता शिक्षण क्षेत्रात ऊचं भरारी घेत आहेत - डॉ. यशवंत म्हात्रे
आई वडिलांचे स्वप्न साकार केले हेच सर्वात मोठे यश- कु.अभिजीत पाटील
दापोडे गावचे नाव संपूर्ण भारतात लौकिक करणारा सुपुत्र अभिजीत- डॉ. विनायक पाटील
भिंवंडी दी.१(स्व.रा.तो)
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दापोडे गावातील सुपुत्र कु.अभिजित तुळशीराम पाटील (२३ वर्ष) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. व आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करून संपूर्ण आगरी समाजाचे नाव रोशन केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.किशोर बळीराम पाटील, मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री सोमनाथ ठाकरे,आणि कोमल समाचार चे संपादक श्रीनिवास सिरीमल्ले व दापोडे गावातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.डॉ.विनायक पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बॅग ,शाल, डायरी,पेन , पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी आयपीएस अधिकारी कु. अभिजीत पाटील यांचे आई, वडील, बहिण, भाऊ व कुटुंबीय उपस्थित होते,
सर्वप्रथम मी दैनिक स्वराज्य तोरण परिवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप,
आर एस पी युनिट ठाणे- पालघर, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, पोलीस पाटील संघटना भिवंडी तालुका या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, आज अभिजीत पाटील यांने आपल्या आगरी समाजाचे नाव संपूर्ण भारतात लौकिक केले आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो, त्याच्यासारखी उंच भरारी आपल्या युवा पिढीने घ्यावी व त्याचा आदर्श समोर ठेवावा असे मी सर्व युवा पिढीला आवाहन करतो, कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिकाल तर टिकाल तरच पुढे जाल असे यावेळी संपादक डॉ.किशोर पाटील यांनी सांगितले.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा! या उक्तीप्रमाणे अभिजीत यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करून उंच भरारी घेतली आहे, ज्यावेळी अभिजीत पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून हजर होईल ,त्यावेळी वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं आरएसपी युनिट त्यांना सलामी देण्यासाठी नक्की पोहोचेल, कारण आज आगरी समाजातील अनमोल रत्न म्हणून अभिजीत पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, असे यावेळी आय एस पी कमांडर डॉ.मनीलाल शिंपी यांनी सांगितले, कोकण परिसरामध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे, आम्ही समाज यापूर्वी मागासलेला समाज म्हणून समजला जायचा, मात्र अभिजीत पाटील यांनी आगरी समाजात जन्म घेऊन समाजाचे नाव अतिशय उंचीवर पोहोचविले आहे, अभिजीतच्या वडिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये चांगले काम करून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आपल्या कार्याची ओळख करून नाव रोशन केले होते मात्र अभिजीत यांनी आपल्या वडिलांच्या पुढे जाऊन आपल्या समाजाचे नाव उज्वल केले आहे, त्यामुळे आगरी समाजातील मुले आज शिक्षण क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहेत, म्हणून अभिजीत पाटील याचे मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे यांनी सांगितले, आई-वडिलांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी माझ्याकडून आय एस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न मी आज आयपीएस होऊन पूर्ण केले आहे, यासाठी मला माझ्या आई-वडिलांबरोबर मावशी, भाऊ, कुटुंबीय व सर्व गावांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले म्हणून मी आज त्या सर्वांचे स्वप्न साकार करू शकलो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून मी माझे ध्येय आज पूर्ण केले आहे, माझ्या या यशामागे माझे आई-वडील माझी मावशी सर्व कुटुंबीय माझ्यासोबत होते म्हणूनच मी हे स्वप्न साकार केले आहे, असे यावेळी कु. अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले,भिवंडी तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे दापोडे गावची ओळख आहे, सांस्कृतिक क्षेत्र, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर ठाणे जिल्हा आदर्श निर्माण करून देणारे गाव म्हणजे दापोडे. याच दापोडे गावचा सुपुत्र कुमार अभिजीत तुळशीराम पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या गावाबरोबर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे नाव भारतात लौकिक केले आहे असे म्हणून त्याचे अभिनंदन करतो असे यावेळी डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले ,
Comments
Post a Comment