पालघर जिल्ह्यातील दहावी चा ९३. ५५% निकाल
पालघर _फेब्रुवारी - मार्च २०२३ मधील घेण्यात आलेल्या इ. १० वी (माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील ३०५४८ मुले व २७१७२ मुली असे एकूण ५७७२० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २८११४ मुले उत्तीर्ण तर २५८८५ मुली उत्तीर्ण असे एकूण ५३९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९२.०३% मुले व ९५.२६ % मुली असा एकूण ९३.५५ टक्के निकाल लागला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे पालक मंत्री जिल्हा पालघर, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर. व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment