पालघर जिल्हा परिषद आयोजित, लोकार्पण सोहळ्यासाठी स्थानिक आमदार राजेश पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न ?

पालघर जिल्हा परिषद आयोजित, लोकार्पण सोहळ्यासाठी स्थानिक आमदार राजेश पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न  ? 
पालघर. ( एच. लोखंडे )  दिनांक ३ जून २०२३ रोजी् *पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दुपारी ०३:०० वाजता मनोर येथे जिल्हा औषध भांडार चे उद्घाटन आणि दुपारी ०३:३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी निवास्थानचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेला असताना*
          सदर या कार्यक्रम संदर्भात  मा. श्री राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा ( स्थानिक आमदार ) यांना सदर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी दिनांक २ जून २०२३ रोजी रात्री फोन वरून आमंत्रण देऊन व व्हॉट्सअप द्वारे कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्याने आमदार राजेश पाटील चांगलेच संतप्त झाले असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार कार्यक्रम करीत आहेत. याआधी सुद्धा अशाच प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच कार्यक्रम ठरवले जात असल्याची संतप्त भावना आमदार राजेश पाटील यांनी बोलून दाखवली आहे, व हे राज्य लोकांचे आहे की,अधिकाऱ्यांचे अशी संतप्त  प्रतिक्रिया आमदार राजेश पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी