भारतीय मार्क्सवादी पक्षा व्दारे ग्रामपंचायत माहीम ता. जि. पालघर वर प्रमुख मागण्या साठी मोर्चा. दिनांक ३

भारतीय मार्क्सवादी पक्षा व्दारे ग्रामपंचायत माहीम ता. जि. पालघर वर प्रमुख मागण्या साठी मोर्चा. 
दिनांक ३ 
पालघर ( एच. लोखंडे ) दिनांक २ जून २०२३ रोजी भारतीय मार्सवादी - लेनिनवादी ( लालाबावटा ) पक्षाच्या वतीने पालघर जिल्हा सदस्य वसई तालुका सेक्रेटरी कॉ. शेरू वाघ व कॉ. किरणभाऊ निजाई यांनी आपल्या प्रमुख मागण्या संदर्भात ग्रामपंचायत माहिम ता. जि. पालघर यांना दिनांक ३० मे २०२३ च्या  आधिसुचना दिलेल्या पत्राअनुसार आपल्या मागण्या साठी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांच्यासह शांततेच्या मार्गाने ग्रामपंचायत माहिम येथे मोर्चा घेऊन आले असताना, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने, माहिम ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री. विजय बिल्लेवार व मोर्चे करी याचे प्रमुख प्रतिनिधी यांच्या मध्ये, संघटनेने दिलेल्या पत्राअनुसार विषयावर, ग्रामपंचायत माहिम कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात खालील विषयावर चर्चा करण्यात आली. 
              मच्छिविक्री विक्री करणाऱ्या स्थानिक महिला यांना, सन २०२३ / २४ च्या आर्थिक वर्षासाठी शितपेटीचे त्वरित वाटप करणे. वंचित घटक- परित्यक्त / विधवा / निराधार महिला यांना तात्काळ साहित्य वाटप करणे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सौच्चालय अनुदान तात्काळ मिळाले पाहिजे. मच्छी सुकविणाऱ्या महिलाना ( वलाणी ) बांबू साहित्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात याव्या. श्रावण बाळ तिर्थ यात्रा अंतर्गत, वंचित घटक / विकलां / विधवा महिलांसाठी सहलीचे आयोजन करणे. विकलांग लाभार्थी यांना शासनाच्या निर्णायानुसार घर पट्टीत ५०% टक्के सवलत मिळाली पाहिजे. ग्रामपंचायती मार्फत रस्ते, गटारी, व लाईट आदी मुलभुत सुविधा तात्काळ मिळाव्यात. उघड्या गटारांनवर तात्काळ झाकणे टाकण्यात यावी. रोजगार हमी योजना संदर्भात माहिती मिळवी. आदी विषयांवर ग्रामविकास अधिकारी श्री. विजय बिल्लेवार यांनी श्री. भीमसेन गायकवाड सहा. पो. निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत माहिम कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली.महिलांच्या  समस्या बाबतीत सहकार्याची भुमिका घेत मोर्चेकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले. 
      सध्या ग्रामपंचायत माहिम येथे सरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपल्यामुळे, ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. सदर विषयावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चा करून ठराव घेण्यात येतात परंतु आता ग्रामपंचायती वर प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. तरीही  ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सदर विषयावर चर्चा करण्यात येऊन, सर्वानुमते योग्य ते निर्णय घेण्यात येणार. असे प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने श्री विजय बिल्लेवार ग्रामविकास अधिकारी माहिम यांनी आलेल्या शिष्टमंडळ सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी