डोंबिवलीतील रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना!

डोंबिवलीतील रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना! 

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) प्रतिनिधी -- डोंबिवली पूर्व मधील रिक्षा चालक श्री.सूर्यकांत गुलाबराव शिरसाट हे गेल्या ४०/४५ वर्षापासून प्रामाणिकपणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत आहेत. हलाखीची परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आज त्यांचा सुपुत्र कु. दुर्वेश सूर्यकांत शिरसाट यांस नुकतेच जर्मनी येथे एर्लागंन न्यूर्नबर्ग शहरातील फेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी येथे दोन वर्षासाठी मास्टर ऑफ सायन्स इलेक्ट्रो मोबिलिटी या शिक्षणासाठी ऍडमिशन मिळाले आहे.त्याचे वडील सध्या डोंबिवलीत रिक्षा चालक असून त्यावर आपली उपजविका चालवत आहेत. रिक्षचालकाचा मुलगा शिक्षणासाठी जर्मनी गेल्याने सर्वत्र  मुलाचे कौतुक  होत आहे.दूर्वेश चे प्राथमिक शिक्षण डोंबिवली येथे झाले,शिक्षणाची आवड असणाऱ्या दूर्वेश ला पुढील शिक्षणासाठी जर्मनी पाठविण्यासाठी त्याच्या आई वडिलांना आर्थिक अडचण होती परंतु शासना तर्फे स्कॉलरशिप मिळाल्या मुळे त्यास जर्मनी पाठविणे सोयीस्कर झाले.स्कॉलरशिप मिळाल्यामुळे आता त्यांना फक्त तेरा हजार रुपये प्रति सेमीस्टर ऐवढा खर्च येणार असल्याचे त्याच्या आई वडिलांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.  दूर्वेश च्या विदेश वारीने शिंदखेडा येथील त्याचे मामा अमोल शिंपी व त्यांचा परिवार तसेच संपूर्ण शिंपी समाज व मित्र परिवारा तर्फे दूर्वेशच्या उज्वल      भवितव्यासाठी ,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.किशोर बळीराम पाटील, डोंबिवली रोटरी चे सचिव डॉ.किशोर अढळकर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ  यशवंत म्हात्रे, पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे व कल्याण डोंबिवली मधील सर्व रिक्षा चालक मालक संघटनांकडून दुर्वेश शिरसाट याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे... तसेच सर्व संघटनांकडून दुर्वेश ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कु. दूर्वेश सिरसाठ याचा परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याचे गुरुवर्य टी.जी.जे. स्टडी सेंटरचे संचालक प्रा प्रशांत रविंद्र बढे यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी