जिल्हा परिषद मध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा



*जिल्हा परिषद मध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा*
पालघर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद पालघर येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी  मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  कलश पूजन करून स्वराज्य गुढी उभारण्यात आली.तसेच राज्यगीताचे गायन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.छत्रपतींच्या धोरणांनुसार सर्वांनी एकत्रितपणे काम करून जिल्ह्याचा विकास केला तरच खऱ्या अर्थाने हा  दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन यावेळी उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) संघरत्ना खिल्लारे, सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी