पालघर येथील आर्यन शाळेच्या विद्यार्थी प्रिय माजी शिक्षिका मोगरे बाई यांचे दुःखद निधन
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
पालघर- दिनांक १ जून २०२३ रोजी आर्यन शाळेच्या माजी शिक्षिका व संस्थेच्या देणगीदार कांचन पुरुषोत्तम मोगरे ह्यांचे वयाच्या 83 व्या वर्षी, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. पालघर येथील वेवूर गावाच्या त्या रहिवाशी होत्या व पालघर येथील आर्यन शाळेच्या माजी विद्यार्थी होत्या. आर्यन संस्थेला अगदी पहिल्या पगारा पासून रिटायर्ड होई पर्यंत शेवटच्या पगारा पर्यंत दरमहा आपल्या पगारातून शाळेला देणगी देत असत. यातूनच त्यांची शाळा व संस्थे विषयीचे प्रेम व तळमळ तळमळ दिसून येते.
वयोमानानुसार जवळपास २० वर्ष त्या पालघरला येऊ शकल्या नाहीत,परंतु दादर येथील हिंदू कॉलनीतील त्यांच्या घरी येणाऱ्या विध्यार्थी व शिक्षकांकडून त्या पालघरच्या शाळेची माहिती घेत असत. श्री. केदार काळे यांनी, *आर्यन शाळेत* ईयत्ता ५वीत प्रवेश घेतला तेव्हा, त्या त्यांच्या क्लास टीचर होत्या. अत्यंत मायेने व आपुलकीने त्या त्यांच्या सोबत व विद्यार्थी सोबत वावरत होत्या. तसेच दर आठवड्याला येताना, एक बॅग घेऊन येत असत व त्या बॅग मधील गोष्टीची छोटी छोटी पुस्तकं वाचायला देत असत. यामुळे काळे यांना शिक्षणासोबत इतर वाचनाची आवड लागली. काळे सांगतात, त्यांना आठवतं त्या कधीही वर्गात रागवत नसत किंवा विद्यार्थ्यांना शिक्षा करत नसत. तरीही खेळीमेळीने सर्व विद्यार्थी अभ्यास करत असत .
कांचन मोगरे त्यांचे हाताखाली शिक्षण घेतलेले, हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात, नाविन्यपूर्ण पणे काम करीत आहेत. शाळेच्या दिवसाचा विषय निघाला तर मोगरे बाईंचा विषय नक्कीच निघतो . मोगरे बाईंना विनम्र श्रद्धांजली.
सौजन्य - श्री. केदार काळे - अध्यक्ष समन्वय समिती आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबई.
Comments
Post a Comment