दांडी गावातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती अधिकारी पालघर यांच्या शुभहस्ते दोन लाख लिटर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन ही दांडी मोरेपाडा येथे करण्यात आले

बोईसर (प्रतिनिधी)दि. 10/06/2023 रोजी दांडी गावातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. भानुदास पालवे साहेब, पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. श्री.नरेंद्र रेवणकर साहेब, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हापरिषद सदस्या श्रीमती वैदेही वाढाण, सरपंच दांडी श्री. जयेश पाडेकर, उपसरपंच श्रीमती नमिता तामोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय तामोरे, दांडी ग्रामविकास अधिकारी श्री. अरविंद संखे, ग्रामपंचायत सदस्य श्री. किरण तामोरे, व इतर ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी आपल्या गावातील पाणी, आरोग्य, शिक्षण व इतर विकास कामासंबंधी समस्या वरिष्ठ अधिका-यां समोर मांडल्या. त्याच वेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांच्या शुभहस्ते दोन लाख लिटर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन ही दांडी मोरेपाडा येथे करण्यात आले.
Comments
Post a Comment