श्री. विजय बाल्लेवार- ग्रामविकास अधिकारी माहीम यांच्या कडून ९३% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थी याचा सत्कार.

*श्री. विजय बाल्लेवार- ग्रामविकास अधिकारी माहीम यांच्या कडून ९३% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थी याचा सत्कार*. 
  दिनांक ८ 
पालघर ( एच. लोखंडे  ) सन २०२३ च्या एस. एस. सी बोर्डाच्या परिक्षेत ग्रामपंचायत माहिम ता. जि. पालघर हद्दीतील ९३% टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कु. श्रुशील धीरज पाटील- ९५.२०% टक्के, कु. नवल कैलास रंजक- ९३.८०% टक्के, कु. हर्ष अशोक पाटील ९३% टक्के यांच्या दिनांक २ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय माहीम ता. जि. पालघर. येथे शालेय उपयोगी वस्तू व पुष्पगुच्छ देऊन श्री. विजय बिल्लेवार - यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
             याप्रसंगी   ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांनीही विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी विद्यार्थी यांचे पालक उपस्थित होते. यांना संबंधित करताना ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले, सदर सत्कार समारंभ हा साध्या पद्धतीने जरी करीत आहोत. तरी यामुळे विद्यार्थी यांना, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. व आयुष्यात अधिकाधिक प्रगती होत रहावी. यासाठीच त्याना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी