डोंबिवली चा मानाचा तुरा हॅम रेडिओ टीम शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाला रवाना!

डोंबिवली चा मानाचा तुरा हॅम रेडिओ टीम शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाला रवाना! 
डोंबिवली. दि.३१(स्व.रा.तो) 
हॅम रेडिओ ही एक कम्युनिकेशन सिस्टम आहे याची एक तुकडी डोंबिवलीला तैनात असते हॅम रेडिओ जगभरात १९०८ पासून वापरात येतो भारतात याची सुरुवात १९२१ पासून सुरू झाली तेव्हापासून आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांनाही याचा लाभ होतो
माननीय रायगड कलेक्टर यांच्या आदेशावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र रायगड चे सागर पाठक यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील हॅम रेडिओ ची टीम व सहकारी तांत्रिक सहाय्यक जयप्रकाश यांच्यासह श्री बिमल नाथवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. श्री.किशोर अढळकर यांच्या मार्गदर्शनात १४ सहकाऱ्यांसह  रायगडाला होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या १ जून ते ६ जून या काळात बंदोबस्तासाठी रवाना झाली. 
 आपत्तीच्या काळात जेव्हाही टेलेकम्युनिकेशन सिस्टम व सिग्नल यंत्रणा निकामी होतात त्यावेळेस हॅम रेडिओ ची टीम स्वतःची सिग्नल यंत्रणा स्थापन करून जगभरात कम्युनिकेशन करू शकते यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला आपत्ती काळात मदतीचा हात मिळतो अशी माहिती डॉ.श्री.किशोर अढळकर यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली .

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी