हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी. सफाळे पो. ठाणे. ता. जि. पालघर.
हरवलेल्या व्यक्तीच्या शोध कामी. सफाळे पो. ठाणे. ता. जि. पालघर.
सफाळे ( एच. लोखंडे ) दिनांक ३ जून २०२३ रोजी कलावती कैलाश जाधव वय. वर्षे ४० रा. पारगाव ता. जि. पालघर यांनी सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर येथे येऊन खबर दिली की, त्यांचे पती कैलाश गजानन जाधव वय. वर्षे ४५ हे पारगाव येथील त्यांच्या राहत्या घरातून दिनांक ३१ मे २०२३ रोजी पहाटे, अंदाजे ३ च्या सुमारास कोणासही काही एक न सांगता. वेड्याच्या भरात घरातून कुठे तरी निघून गेले. त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे, मित्र मंडळी यांच्या कडे तपास केला असताना, ते कुठेही आढळून न आल्याने व आजपावेतो घरीही परत आले नाही.
या संदर्भात सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर येथे मनुष्य मिसिंग रजि. नं. ०६ / २०२३ ने कलावती जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे. पालघर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी श्री अमोल गवळी सहा. पो. निरिक्षक यांच्या सहकार्याने तपसी अंमलदार श्री. ए.व्ही खोत हे पुढील तपास करीत आहेत.
फोटोत दिसत असलेली आणि वर्णन केलेली व्यक्ती एकच आहे.
कैलाश गजानन जाधव. वय वर्षे ४५,अंगात नेसून- सफेत रंगाचा टी शर्ट, त्यावर केसरी रंगाचे पट्टे असलेली जांभळ्या रंगाची काॅलर, टी शर्ट च्या डाव्या बाजूस छातीवर व पाठीवर- वसई - विरार महानगरपालिका कंत्राटी कामगार असे लिहिले आहे. काळ्या रंगाची हाफ पॅन्ट, रंग- सावळा, अंगाने सडपातळ, उंची- ५फूट ६ इंच, चेहरा- लांब, नाक- सरळ, तोंडात समोर दोन दात बाकी पडलेले, डोक्यास समोरील बाजूस टक्कल, केस - काळे, भाषा मराठी बोलतो.
सदर व्यक्ती कोणासही कुठेही आढळून आल्यास किंवा दिसून आल्यास खालील मोबाईल नंबर संपर्क करावा
सफाळे पोलीस ठाणे मो. नंबर ८६६९६०४०३६ किंवा ८६६९६०४०३७
Comments
Post a Comment