जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मान्यवर यांच्या हस्ते, विळंगी ता. जि. पालघर येथे कांदळवन प्रजातीच्या वृक्षाचे रोपण संपन्न*दिनांक ६ जून

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मान्यवर यांच्या हस्ते, विळंगी ता. जि. पालघर येथे कांदळवन प्रजातीच्या वृक्षाचे रोपण संपन्न*
दिनांक ६ जून
सफाळे ( एच. लोखंडे ) ५ जून जागतिक पर्यावरण दिवस. या पर्यावरण दिनानिमित्ताने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या पर्यावरण विषयावर जागृतता आणि कृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कारण पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची जाणीव व सकारात्मक दृष्टीकोन वाढीस. पर्यावरणामुळे जगावर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होतात.  जगभरात पुढील, जिवनातील परिस्थिती किती बिकट होईल यांचा विचार करता, ठिकठिकाणी पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवून, पुढील धोका टाळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. 
                 जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दिनांक ५ जून २०२३ रोजी रोजी श्रीम. स्नेहल सुरेश म्हसकर - वनपरिक्षेत्र अधिकारी सफाळे ता. जि. पालघर यांनी मॅंग्रोव्ह फाउंडेशन सहयोगाने मौजे. विळंगी पो. आगरवाडी ता. जि. पालघर येथील विळंगी खाडी लगतच्या किनाऱ्यावर मान्यवर लोकप्रतिनिधी मा. श्री. राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा यांच्या हस्ते व श्रीम. सरिता सुतार- जि. प. सदस्या पालघर, श्रीम. रेखा तरे- पं. स. पालघर सदस्यां, श्री. राजेश म्हात्रे ( बंटी म्हात्रे ) सामाजिक कार्यकर्ते सफाळे, श्री. विनोद मोरे - सरपंच ग्रा. पं. तिघरे आंबोडे, श्री. सुमिता घरत- सरपंच विळंगी, श्री. पल्लवी पाटील - सरपंच माकुणसार, श्री. पी. टी. पाटील सर ब. वि. आघाडी जेष्ठ पदाधिकारी, श्री. कामनिक्ष राऊत- ब. वि. आघाडी युवा ता. प्रमुख. तसेच मॅगोव्हा फाउंडेशन चे पदाधिकारी / कर्मचारी, सफाळे वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांच्या सहयोगाने अंदाजे २०० च्या वर कांदळवन प्रजातीच्या वृक्षाचे विळंगी गावातील खाडी किनारी लागवड करण्यात आली. या मुळे पर्यावरणाला निर्मिती साठी पोषक असे वातावरण तयार होण्यास मदतच होईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी याचे सांगणे आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी