सफाळे पो. ठाणे हद्दीत ओढणीने गळा आवळून महिलेचा खून !

सफाळे पो. ठाणे हद्दीत ओढणीने गळा आवळून महिलेचा खून  ! 


दिनांक ६ जून

सफाळे ( एच. लोखंडे ) सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला असलेल्या मौजे. मांडे गावातील मुजबादेवी मंदिराच्या समोरील रोडच्या पलीकडे, अंदाजे ३०० मिटर अंतरावर असलेल्या. प्रसन्ना हरिश ठाकुर यांच्या मालिका असलेल्या शेतातील गवतात एक महिला जातीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळून आली असताना, सफाळे पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी धाव घेऊन पोहोचले. त्यांनी पुढील तपास केला असता त्यांना खालील प्रमाणे माहिती मिळून आली आहे. 
         मदन बहादूरसिंग बिक वय वर्षे ३२ धंदा नोकरी. रा. ९ स्टार लॅन्ड मार्क माकणे ता. जि. पालघर मुळ गाव अचमा जि.  मंगलसिंग राज्य नेपाळ. मयत महिला पद्मा बहादूरसिंग बिक वय वर्षे ५६ हि मदन बिक यांची आई असून, तिही मदन सह ९ स्टार लॅन्ड मार्क माकणे येथेच राहते. कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक ५ जून २०२३ रात्री अंदाजे १० - ३० ते दिनांक ६ जून २०२३ च्या सकाळी ९ च्या दरम्यान तिच्याच ओढणीच्या सहाय्याने, तिचा गळा आवळून खून केला. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत मांडे गावातील मुजबादेवी मंदिराच्या समोरील व रोडच्या पलीकडे असलेल्या प्रसन्ना ठाकुर यांच्या शेतातील गवतात टाकून देऊन पळून गेला. या अनुषंगाने फिर्यादी मदन बिक  याने दिलेल्या तक्रारी वरून सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर येथे गुन्हा रजि. I ५० /२०२३ भा. दं. वि. सं. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                 सदर घटना स्थळी श्रीम. निता पाडवी- पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी व सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी श्री अमोल गवळी सह. पो. निरीक्षक यांनी भेट दिली असून, पालघर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल गवळी सहा. पो निरीक्षक आपल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या सह खून करण्यामागील कारण काय❓ व कश्यासाठी खून करण्यात आला. यासाठी पुढील तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी