पालघर संस्कृतिक मित्र मंडळा व्दारे मोफत वैयक्तिक करिअर मार्गदर्शन शिबिर पालघर येथे संपन्न.

पालघर संस्कृतिक मित्र मंडळा व्दारे मोफत वैयक्तिक करिअर मार्गदर्शन शिबिर पालघर येथे संपन्न. 

५ जून. 
          पालघर ( एच. लोखंडे )  दिनांक ४ जून २०२४ रोजी पालघर संस्कृतीक मित्र मंडळ आयोजित मोफत वैयक्तिक करिअर मार्गदर्शन शिबिर आर्यन शाळा पालघर येथे आयोजित करण्यात आलेले. 
       एस. एस सी व एच. एस सी ( आर्ट्स / कॉमर्स  / सायन्स )  नंतर पुढे काय ? याबाबत विद्यार्थी व पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. कुठे ऍडमिशन घेऊ? कशी ऍडमिशन घेऊ? किती कोर्स आहेत ? त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी? या सर्व शंका निरसन व मार्गदर्शन /  मदत करण्यासाठी  *प्रोफेसर श्री चिराग काळे* M.Tech, Phd ( pursuing ) व *प्रोफेसर श्री मकसूद मेमन* M.com, LLB , Phd ( pursuing ) यानी रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी पालघर येथील आर्यन शाळेत मोफत वैयक्तिक करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलेले. त्या शिबिरात, पुढील शिक्षणासाठी आवश्यक लागणारी  ( सायन्स, कॉमर्स,आर्ट साठी ) कागदपत्रे - दाखले ती कशी व कुठे मिळतील यांची  याची सविस्तर माहिती.  विद्यार्थी व पालकांना देण्यात आली .
              शिबिर संपन्न करण्यासाठी  सौ. चिन्मई काळे यांनी मदत केली. यावेळेस डॉ. सौ. उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्षा. श्री.केदार काळे - पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष. श्री. गावित सर -  मुख्याध्यापक आर्यन शाळा- पालघर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच अनेक
 शिबिरार्थी विद्यार्थ्यां, पालक यांची उपस्थिती होती. सदर प्रसंगी, प्रोफेसर चिराग काळे यांनी तुम्हाला कधी ऍडमिशन बाबत शंका असल्यास मला पण फोन करून विचारावे मी आपल्यासाठी सदैव तयार आहे असे ही सांगितले

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी