जागतिक पर्यावरण दिनी खारफुटीचे वृक्षारोपण
*जागतिक पर्यावरण दिनी खारफुटीचे वृक्षारोपण*
..पालघर दि. ०५ : संपूर्ण जग विकासाच्या वाटचालीवर असताना बऱ्याचशा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठीच दर वर्षी जागतिक पर्यावरण दिन ०५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. यावर्षीगी थीम आहे 'प्लॅस्टिक प्रदूषणावर मात. प्रत्येक ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम राबवून भविष्यातील धोका टाळण्यासाठीच्या उपाययोजना करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध विषयांवर जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.
..पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याद्वारे केंद्रीय अर्थसंकल्पात २०३३-२४ मध्ये नवीन MISHTI योजना मा. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सादर करण्यात आली. किनारी प्रदेशातील जीवन आणि स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धनाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य देत मँगुव्ह इनिशिएटीव फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टॅनजिबल इन्कम्स (मिष्टी - MISHTI) योजना 4 जून जागतिक पर्यावरण दिनापासून राबविण्याचे आयोजिले आहे.
..यामध्ये कांदळ प्रजातीच्या वृक्ष लागवडीला अधिक महत्व दिले गेले आहे त्याचे कारण असे की कांदळवने हि मानवीवस्ती आणि सागरी किनारपट्टी यांमधील नैसर्गिक भिंत आहे जी वादळे आणि त्सुनामी यांसारख्या आपत्तीपासून किनारपट्टी लगत राहणाऱ्या मानवी वस्तींचे संरक्षण करते. याच अनुषंगाने संपूर्ण भारतात ७५ खाजण क्षेत्रांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामध्ये १५ खाजण क्षेत्र हे महाराष्ट्रातील असून त्यातील पालघर जिल्ह्यातील टेंभोडे, विळंगी, सोनवे वडदे, आसनगाव अश्या एकूण ०६ ठिकाणांचा समावेश होता.
..मौजे टेंभोडे क्षेत्रात पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण घेण्यात आले, मौजे विळंगी येथे आमदार राजेश पाटील यांचे हस्ते, मौजे सोनावे येथे पंचायत समिती सदस्या मनिषा निमकर तर मौजे वडदे येथे आमदार विनोद निकोले आणि मौजे आसनगाव या ठिकाणी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी स्थानिक गावकरी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या कार्यक्रमाला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मधुमिचा एस. उपवनसंरक्षक वनविभाग डहाणू व आर. ट. मगदूम सहा. वनसंरक्षक MMCU मुंबई उपस्थित होते. तसेच कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि वनविभाग डहाणू यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अशी सांगता उप - वनसंरक्षण वनविभाग डहाणू यांनी केली.
***
Comments
Post a Comment