कोरोनामुळे पालक गमावलेल्या १८ वर्षाखालील बालकांना मिळणार दहा हजार रुपये

*कोरोनामुळे पालक गमावलेल्या १८ वर्षाखालील बालकांना  मिळणार दहा हजार रुपये*

...पालघर (प्रतिनिधी)दि.०९ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई व वडील गमावलेल्या बालकांच्या शैक्षणीक खर्चासाठी दहा हजार रुपयांचा बालनिधी मिळणार आहे. याकरीता प्रस्ताव पाठविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीकरीता पात्र बालकांना लाभ देण्याकरीता  कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास एकदाच शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये  बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार असून,  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे ३० जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
..मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  मलिनाथ कांबळे यांनी दिली.  प्रस्ताव संबधी काही तांत्रिक अडचणी आल्यास या कार्यालयाने दिलेल्या पत्यावर जिल्हा बाल संरक्षण कक्ष पालघर कक्ष क्रमांक १०८, प्रशासकिय बिल्डींग अ इमारत, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, बोईसर रोड कोळगांव, पश्चिम पालघर ४०९४०४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री कांबळे यांनी केले.
*****

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी