ॲड.निलेश राऊत यांना साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार २०२३ जाहीर.
ॲड.निलेश राऊत यांना साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार २०२३ जाहीर.
दिनांक ९ जून.
पालघर ( एच. लोखंडे ) पालघर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,कवी,लेखक ॲड.निलेश रमेश राऊत यांना यावर्षीचा सामाजिक काम करणाऱ्या " राष्ट्रीय बहुजन विकास संघटना,महाराष्ट्र राज्य ( रजि. ) व प्रजा सुराज्य चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने यावर्षीचा *साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार २०२३* जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक २५ जून २०२३ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या *शिवभिम जन्मोत्सव व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने, संयुक्त जयंती उत्सव* सोहळा वसई जिल्हा पालघर येथील स्व. अण्णासाहेब वर्तक सभागृह येथे *श्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या* पूर्वसंध्येला सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात येईल. त्यावेळी मान्यवर यांच्या हस्ते ॲड. निलेश रमेश राऊत यांना *साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार २०२३* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. असे आयोजकांच्या वतीने लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
ॲड.निलेश राऊत हे मागील २३/२४ वर्षापासून सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.तर राजकीय राजकारणी, मा. खासदार, मा. आमदार यांचे स्वीय सहायक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असून. त्या माध्यमातून अनेक विकास कामांना गती देण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे.तसेच गरीब - गरजू विद्यार्थी, महिला, बेरोजगार यांना सहकार्य करणे, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, अपंगांसाठी व विविध आजाराने आजारी असलेल्या रुग्णांना निधी सहाय्य मिळवून देणे असे कार्य करीत असतात. पालघर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतचं वेगळा ठसा उमटवला असून *मित्र फाऊंडेशन* या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम, व आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करीत असतात. त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याने मित्र परिवारातर्फे आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment