पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी जिल्हाधिकारी गोविंद बोडके

*पर्यावरणाचे संरक्षण करणे  ही सर्वांची जबाबदारी*
*जिल्हाधिकारी गोविंद बोडके*

पालघर दि 5 : पर्यावरणामध्ये  असमतोलपणा असला की पावसाळ्यामध्ये  कमी प्रमाणात पाऊस पडतो, तीव्र उन्हाळा जाणवतो, तसेच अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी झाडे लावणे व झाडांचे संगोपन करणे आवश्यक असून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे
.  जागतिक    पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन किशोर मुसळे चारिटेबल ट्रस्ट यांनी केले त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके बोलत होते.
                                        यावेळी   निवासी      उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार चंद्रसेन पवार, तसेच किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते
 जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्मितीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून तीन हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे तसेच या झाडाचे संगोपन देखील ट्रस्ट करणार आहे. परिसरातील बाग बगीचा यांचे देखील संगोपन व संवर्धन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. अशा नागरिकांना विसावा घेण्यासाठी सावली उपलब्ध होणार आहे . विकासाच्या मार्गाने जात असताना  विकास व पर्यावरण याचे समतोल राखणे आवश्यक आहे. नागरिकांनी झाडे लावली पाहिजेत  व त्या झाडाचे संगोपन योग्यरीत्या करणे गरजेचे आहे. सावली देणाऱ्या झाडा सोबतच  फळ देणारे झाडे देखील लावली पाहिजेत. असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले 
 निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले, या संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी 5 हजार वृक्षाची लागवड करण्यात आली होती तसेच त्या वृक्षाचे संगोपन करण्यात आले होते. संगोपन करण्यात आलेल्या  5 हजार झाडांपैकी 4 हजार 500 पेक्षा अधिक झाडे जिवंत आहेत जिल्हाधिकारी कार्यालय,व परिसरातील सर्व कार्यालयांचे  सौंदर्य फुलविण्याच्या दृष्टिकोनातून 103 हेक्टर क्षेत्रावर 40 प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्याची जबाबदारी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट  यांनी स्वीकारली आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन  यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी