एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अनुदानासाठी अर्ज सादर करावे
*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अनुदानासाठी अर्ज सादर करावे*
पालघर (प्रतिनिधी)दि. 02 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याफळपिेकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे.
राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.
कट फ्लॉवर्स या घटकासाठी अल्पभुधारक शेतकरी यांना अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 40,000/- प्रति हेक्टर, तसेच इतर शेतकरी यांच्यासाठी अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 25,000/- प्रति हेक्टर असेल. कंदवर्गीय फुले या घटकासाठी अल्पभुधारक शेतकरी यांना एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 60,000/- प्रति हेक्टर असेल. तसेच इतर शेतकरी यांच्यासाठी अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 37,500/- प्रति हेक्टरअसेल. सुटी फुले या घटकासाठी अल्पभुधारक शेतकरी यांना अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 16,000/- प्रति हेक्टरअसेल. तसेच इतर शेतकरी यांच्यासाठी अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 10,000/- प्रति हेक्टर असेल.
मसाला पिक लागवड, बिया वर्गीय व कंद वर्गिय मसाला पिके या घटकासाठी अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के रक्कम रुपये 12,000/- प्रति हेक्टर असेल. तसेच बहुवर्षिय मसाला पिके या घटकासाठी अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के रक्कम रुपये 20,000/- प्रति हेक्टर असेल. विदेश फळपिक लागवड, ड्रॅगनफ्रुट या घटकाला अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1,60,000/- प्रति हेक्टर असेल. स्ट्रॉबेरी या घटकाला एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1,12,000/- प्रति हेक्टर असेल. तसेच अवॅकॅडो या घटकाला अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1,60,000/- प्रति हेक्टर असेल. जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या घटकासाठी अनुदान मर्यादा खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत-जास्त रू. 20,000 प्रति हेक्टर असेल.
तरी, सर्व शेतकाऱ्यांना आवाहन करण्यात येते की, विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in यावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिाकरी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment