परिचारीका ठरल्या देवदुत, नवजात बालकांचे प्राण वाचविले.

परिचारीका ठरल्या देवदुत, नवजात  बालकांचे  प्राण वाचविले.

दिनांक :२६ऑगस्ट २०२६
मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील )

करावे तेवढे कौतुक आणि वेळीच दाखवलेले धाडस,,,
सोमवारी पहाटे साडेतीन वाजताची ती वेळ. संपूर्ण अमरावती शहर गाढ झोपेत होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात परिचारिका ललिता कासदेकर नेहमीप्रमाणे अतिशय काळजीपूर्वक नवजात बालकांची शुश्रूषा करत होत्या. शांतता पसरलेली असतानाच अचानक एका व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला.
छतावरील आपत्कालीन वॉटर सिस्टीम जळून खाक झाली, व्हेंटिलेटरचे तुकडे-तुकडे उडाले आणि काही क्षणांतच संपूर्ण कक्षात काळोखासोबत धुराचे प्रचंड लोळ उठले. डोळ्यांसमोर मृत्यूचे तांडव दिसत असताना, स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या दोन परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. स्वतःचे हात आगीत भाजले तरी चालेल, पण काचेच्या पेटीत बंद असलेल्या निष्पापांना मरू द्यायचे नाही, या एकाच जिद्दीने डफरीनच्या या देवदूतांनी तब्बल ३६ चिमुरड्यांचे प्राण वाचवले.या जिल्हा स्री रूग्णालय अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट होत नाही याला जबाबदार कोण उदया या निष्पाप नवजात शिशूचे प्राण गेले असते तर कुठून भरपाई केली असती. हा निष्काळजी पणा किती महागात पडला असता.अनेकदा हाच अनुभव सोसायटी, ऑफिस, हॉटेल्स, कारखाने  येथे पहायला मिळतो, संबंधित अधिकारी वर्ग पगार कसला घेतात.या करीता नियमित फायर ऑडिट झालेच पाहिजे. त्रुटी आढळून आली तर परवाना रद्द करण्यात यावा तरच वचक बसेल निष्काळजीपणाला.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी