१लीत शिकणाऱ्या मुलांच्या मृत्यू कारणीभूत, असलेली "मासवण आश्रमशाळा" शासनाने ताब्यात घ्यावी — सीता घाटाळ, श्रमजीवी संघटना*
*१लीत शिकणाऱ्या मुलांच्या मृत्यू कारणीभूत, असलेली "मासवण आश्रमशाळा" शासनाने ताब्यात घ्यावी — सीता घाटाळ, श्रमजीवी संघटना*
२६ऑगस्ट
पालघर ( एच लोखंंडे ) पालघर जिल्ह्यातील, मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता १ ली मध्ये शिकणाऱ्या ७ वर्षीय श्रेयांश अंबात या विद्यार्थ्याचा तापामुळे झालेला दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हि अत्यंत गंभीर घटना असून, या घटनेच्या अनुषंगाने मासवण ता .जि.पालघर येथील आश्रमशाळा शासनाने तातडीने ताब्यात घेऊन शासकीय आश्रमशाळा म्हणून चालवावी, कारणं कातकरी, स्थलांतरित आदिवासी मुलांच्या सुरक्षा, आरोग्य, आणि दर्जेदार शिक्षण यांचा मुलभूत हक्कांचा प्रश्न आहे. यासाठी श्रीम. सिता घाटाळ - श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा यांनी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
कु. श्रेयांश अंबात यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर श्रीम. सीता घाटाळ यांनी मासवण आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शैक्षणिक, निवासी स्थान, आणि तेथील आरोग्यविषयक परिस्थितीची संपुऐ माहिती घेतली असताना , त्यांनी मा . मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
या आश्रमशाळेत विशेषतः कातकरी समाज, तसेच आणि डहाणू आदी परिसरातील रोजंदारीसाठी स्थलांतर करणाऱ्या आदिवासी, गोरगरीब कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. पालकांच्या स्थलांतरामुळे या मुलांसाठी आश्रमशाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, घर, सुरकक्षेचे ठिकाणी आहे. याच ठिकाणी त्यांचे भवितव्य घडत असतें.“आदिवासी पालक, गोरगरीब आपल्या मुलाला आश्रमशाळेत ठेवतो तेव्हा तो त्या मुलाला येथील व्यवस्थेच्या विश्वासावर त्यांच्याकडे सोपवतो. त्या मुलाचे शिक्षण, आरोग्य आणि प्राणांची सुरक्षितता ही याच व्यवस्थेची जबाबदारी असते” असे श्रीम. सिता घाटाळ यांनी मुख्यमंत्री यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलेली आहे.
या अनुषंगाने मासवण येथील आश्रमशाळा शासनाने ताब्यात घेऊन तेथे पुरेसे गुणवत्तापूर्ण शिक्षक व कर्मचारी, सुरक्षित वसतिगृह, पौष्टिक आहार, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी २४ तास सक्षम आरोग्य व आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, नियमित आरोग्य तपासणी, आजारी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची नोंद ठेवणारी निश्चित कार्यपद्धती लागू करण्याची मागणीही केली आहे.
कु. श्रेयांश अंबात यांच्या मृत्यूच्या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य केवळ शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित न ठेवता. त्यांना डॉक्टर, अभियंता, वकील, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांत जाण्यासाठी त्यांना उच्च शिक्षणासाठी संधी, शासकीय वसतिगृहे, शिष्यवृत्ती साठी मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, “श्रेयांशला आपण परत आणू शकत नाही; पण त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी हजारो आदिवासी मुलांचे प्राण सुरक्षित करण्यासाठी व्यवस्था बदलू शकतो. त्या बदलाची सुरुवात मासवण आश्रमशाळेपासून व्हावी,” अशी भूमिका सीता घाटाळ यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे मांडली आहे.
Comments
Post a Comment