हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचा शोध; नागरिकांना पोलिसांचे आवाहन
हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचा शोध; नागरिकांना पोलिसांचे आवाहन
सफाळे (प्रतिनिधी) : वेळंगी येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय आरती संतोष स्वामी यांचा केळवा सागरी पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संतोष नागराज स्वामी (वय ३३, रा. वेळंगी, पो. आगरवाडी, ता. जि. पालघर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी आरती संतोष स्वामी या ११ ऑगस्ट २०२६ रोजी वेळंगी येथील राहत्या घरातून वैतरणा-विरार (ता. वसई) येथील फार्मसी कंपनीत पगार आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, त्या पुन्हा घरी परतल्या नाहीत.
याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून, मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक ०६/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
हरवलेल्या आरती संतोष स्वामी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय ३३ वर्षे, शिक्षण ९ वी, उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, बांधा मध्यम, डोळे काळे, केस मोठे व काळे. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘आरती’ नाव गोंदवलेले आहे. गळ्यात मंगळसूत्र व काळे मणी असून, बेपत्ता होताना त्यांनी हिरव्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती.
सदर वर्णनातील व्यक्ती कोणास आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास केळवा सागरी पोलीस ठाणे, ता. जि. पालघर येथे तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : ८६२४०४७६००
Comments
Post a Comment