विद्युत मीटर बसविण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच घेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात

विद्युत मीटर बसविण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच घेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात

दिनांक :२६ऑगस्ट २०२६
मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील )

कंत्राटी रिक्षाचालक जयंता शिवकर आणि कंत्राटी वीजतंत्री दर्शन साळवी यांच्याविरोधात कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल
ठाण्यात बांधकामासाठी तात्पुरते विद्युत मीटर बसवून देण्यासाठी लाच घेताना महावितरणच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली.
बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नवे विद्युत मीटर बसवून देण्यासाठी एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागून त्यातील एक लाख २५ हजार रुपये घेताना दोन खासगी व्यक्तींना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. जयंता शिवकर व दर्शन साळवी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जयंता हा महावितरणमध्ये कंत्राटी रिक्षाचालक म्हणून कार्यरत असून दर्शन हा कंत्राटी वीजतंत्री (इलेक्ट्रीशियन) आहे. या दोघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कोपरी येथील मंगला विद्यालय परिसरात बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरूपात नवे विद्युत मीटर बसवून घेण्यासाठी जयंता शिवकर व दर्शन साळवी यांनी तक्रारदाराकडे एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोपरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने जयंता व दर्शन या दोघांनाही कारमध्ये बोलावले. यावेळी दोघांनी तक्रारदाराकडून एक लाख २५ हजार रुपयांची रोकड स्वीकारली. लाच स्वीकारताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीच्या पथकाने दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी